मुंबई- समाजात जाती व्यवस्थेवरून केला जाणारा भेदभाव आणि याच कारणामुळे समजाकडून दिली जाणारी वागणूक यासारख्या गंभीर विषयावर भाष्य करणारा आर्टिकल १५ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित होणार आहे.
'आर्टिकल १५'च्या ट्रेलर प्रदर्शनाआधी आयुष्मानने शेअर केला व्हिडिओ, तुम्हीही पडाल विचारात
तुमची औकात तुम्हाला हा ट्रेलर पाहण्याची परवानगी देत नाही , हा भेदभाव पाहून वाईट वाटलं ना? भारताच्या कितीतरी मागासवर्गीय लोकांना हे रोज सहन करावं लागत, असं आयुष्मान या व्हिडिओमध्ये सांगत आहे.
यात अभिनेता आयुष्मान खुराणा एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. ट्रेलर प्रदर्शनाआधी आयुष्मानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. आर्टिकल १५ चा हा ट्रेलर असल्याचे कॅप्शनमध्ये म्हटले गेले आहे. मात्र, व्हिडिओ सुरू होताच काही सेकंदात तो बंद होतो आणि आयुष्मान समोर येतो. तुमची औकात तुम्हाला हा ट्रेलर पाहण्याची परवानगी देत नाही , हा भेदभाव पाहून वाईट वाटलं ना? भारताच्या कितीतरी मागासवर्गीय लोकांना हे रोज सहन करावं लागत, असं आयुष्मान या व्हिडिओमध्ये सांगत आहे.
भारताच्या संविधानातील समतेचा अधिकार या 'आर्टिकल १५' वर चित्रपटाची कथा आधारित असणार आहे. देशात जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारावर कोणत्याही नागरिकासोबत भेदभाव केला जाऊ शकत नाही, हेच या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे. २८ जूनला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.