चंदीगड- आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर यांच्या भूमिका असलेल्या बहुचर्चित चित्रपटाला शेवटी एक शीर्षक मिळाले आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘चंडीगड करे आशिकी’ असे या चित्रपटाचे नाव असणार असल्याचे निर्मात्यांकडून आज स्पष्ट करण्यात आले.
यावर आनंद व्यक्त करताना आयुष्मानने इंस्टाग्रामवर लिहिले, "पुढचा टप्पा: पहिल्यांदाच माझे होम टाऊन अभिषेक कपूरच्या या रमणीय प्रेमकथेचा भाग होत असल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे."