मुंबई- बॉलिवूडमध्ये आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारणारा आयुषमान खुराना लवकरच पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. आगामी 'आर्टिकल-१५' चित्रपटात तो ही आगळेवेगळी भूमिका साकारणार असल्याने त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
आयुषमानच्या 'आर्टिकल १५'ची रिलीज डेट निश्चित, 'या' दिवशी होणार प्रदर्शित - police
'आर्टिकल-१५' चित्रपटात आयुषमान आगळेवेगळी भूमिका साकारणार असल्याने त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अशात आता या चित्रपटाची रिलीज डेट निश्चित झाली आहे. येत्या २८ जुनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांनी ट्विट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. 'मुल्क' चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
या चित्रपटात आयुषमानशिवाय ईशा तलवार, मनोज पाहवा, सयानी गुप्ता, कुमुद मिश्रा, एम. नास्सर, आशीष वर्मा आणि जीशान अयूब हे कलाकार भूमिका साकारणार आहेत. तर आयुषमान 'आर्टिकल-१५' शिवाय 'ड्रीम गर्ल' आणि 'बाला' या चित्रपटांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.