महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अ‍ॅथलिटच्या भूमिकेसाठी आयुष्मान खुराना करतोय कठोर मेहनत - आयुष्यमान साकारणार अॅथलिटची भूमिका

आयुष्यमान खुराना आगामी चित्रपटात एका अ‍ॅथलिटची भूमिका साकारणार आहे. यासाठी तो जिममध्ये घाम गाळत असून अशी मेहनत सुरू असतानाचा एक फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Ayushman Khurana
आयुष्मान खुराना

By

Published : Oct 7, 2020, 12:31 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना त्याच्या आगामी चित्रपटात अ‍ॅथलिटच्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठी तो खूप मेहनत घेत असून आयुष्यमानने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, यात तो जिममध्ये वजन उचलताना दिसत आहे.

त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "वेगळ्या चित्रपटासाठी वेगळे बदल. चित्रपटाची तयारी आणखी मजबूत."

रोमँटिक प्रेमकथा अलेल्या या आगामी चित्रपटात अभिनेता आयुष्यमान अ‍ॅथलिटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. उत्तर भारताच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. या महिन्यात शूटिंग सुरू होईल. पुढील वर्षी हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details