महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ऑडिशनची प्रक्रिया तणावग्रस्त असूनही मजेदार - आलिया एफ - आलिया एफचे आगामी चित्रपट

या वर्षाच्या सुरुवातीला जवानी जानेमन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार्‍या अलाया एफला असे वाटते की ऑडिशनमध्ये जाण्याची प्रक्रिया तणावग्रस्त असूनही मजेदार आहे.

Alaya F
आलिया एफ

By

Published : Dec 30, 2020, 7:54 PM IST

मुंबई- अभिनेत्री अलाया एफने आई पूजा बेदीच्या पावलावर पाऊल टाकत चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ती जरी स्टार किड असली तरीही तिचे पदार्पण धर्मा प्रॉडक्शन किंवा यशराज फिल्म्स सारख्या प्रॉडक्शनकडून झाले नाही. अनेक काळापासून ती ऑडिशन्स देत होती आणि हा प्रकार तणावाचा असूनही मजेशीर होता असे तिने म्हटलंय.

ऑडिशनमध्ये जाण्याची प्रक्रिया कशी आहे याबद्दल विचारले असता अलाया म्हणाली, "हे तणावाचे असले तरी मजेदार आहे."

अनुराग कश्यपने आलिया एफचे ७ मिनीटांचे रिल पाहिले आणि आगामी प्रोजेक्ट १० या चित्रपटात तिला कास्टिंग करण्याचे ठरवले.

एका मुलाखतीत अलायाला असेही विचारण्यात आले होते की एकट्या आईने तिचे पालनपोषण कसे केले. यावर ती म्हणाली की, तिचे पालक नेहमी तिच्याबाबत आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असण्यावर भर देतात.

"ज्या देशात पालक विवाहासाठी आपल्या मुलांवर दबाव आणतात त्या ठिकाणी माझे पालक याच्या पूर्णपणे विरोधात होते. जर तुम्ही 30 वर्षांपूर्वी लग्न केले तर तुम्ही मूर्खपणाचे काम करत आहात, असे त्यांना वाटते. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करा, आपल्या कार्यावर लक्ष द्या, स्वतः चा विकास होण्यावर लक्ष केंद्रीत करा, असे मला नेहमी सांगितले जाते, " असे ती म्हणाली.

हेही वाचा - २०२०: रुपेरी पडद्यासह या जगाचा निरोप घेतलेले प्रतिभावंत कलाकार

आलिया आगामी काळात निर्माता जय जय शेवक्रमणि याच्यासोबत तीन चित्रपट करणार आहे.

हेही वाचा - २०२० : सर्वाधिक कमाई 'तान्हाजी' आणि 'बागी ३' ची, १०० कोटी क्लबमध्ये केवळ २ सिनेमे

ABOUT THE AUTHOR

...view details