मुंबई -झी५ वरील बहुप्रतिक्षित 'द कसीनो' ही थ्रिलर वेब सिरीज अखेर रिलीज झाली आहे. याला जबरदस्त प्रतिक्रिया मिळत आहेत. 'द कसीनो' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. प्रेक्षकांशिवाय बॉलिवूड सेलेब्जनाही ही वेब सिरीज आवडल्याचे म्हटलंय. सोशल मीडियावरुन ते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. सुनिल शेट्टीने सुधांशू पांडेचे कौतुक करताना लिहिलंय, 'ऑल द बेस्ट.. छान दिसत आहेस!'
नील नितिन मुकेशने सुधांशु पांडेबद्दल लिहिलंय, ''माझ्या प्रिय भावाला नवा शो लॉन्च केल्याबद्दल ऑल दि बेस्ट! तुमच्या डोक्यावर किती पांढरे केस आहेत, याने काही फरक पडत नाही. तू कधीही वयस्कर वाटत नाहीस. नेहमीप्रमाणे छान दिसत आहेस.''