मुंबई- 'धडकन' चित्रपटातील देवच्या भूमिकेनं घराघरात पोहोचलेल्या आणि प्रेक्षकांची मने जिंकलेल्या सुनील शेट्टीचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने सुनील शेट्टीची मुलगी आथियानं वडिलांसोबतचा आपला लहानपणीचा फोटो शेअर करत त्याला खास कॅप्शन दिलं आहे.
जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा, आथियानं शेअर केला सुनील शेट्टीसोबतचा फोटो - अपयश
माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा, आय लव यू पापा..तुम्ही नेहमी हसत आणि आनंदी रहा, असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा, आय लव यू पापा..तुम्ही नेहमी हसत आणि आनंदी रहा. नेहमी माझ्या पाठीशी उभा राहण्यासाठी धन्यवाद आणि मी अशी आशा करते, तुम्हाला हे माहिती आहे की आम्ही नेहमी तुमचेच आहोत, असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान आथिया शेट्टीनं निखिल अडवाणींचं दिग्दर्शन असलेल्या हिरो चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांची मनं जिंकण्यात अपयश आलं. यानंतर आथिया बॉलिवूडमध्ये खास ओळख निर्माण करू शकली नाही.