महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

केएल राहुलचा फोटो क्रॉप करुन अथियाने शेअर केला फोटो, नाते बिनसले? - अथिया शेट्टी

अथिया शेट्टी आणि के एल राहुल अनेक वेळा एकत्र फिरताना दिसले आहेत. दोघे एकमेकांच्या फोटोवर कॉमेंट्सही करीत असतात. मात्र त्यांच्या नात्यात सर्वकाही नीट आहे का असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे.

ATHIYA-SHETTY-CROPS-RUMORED-BOYFRIEND-KL-RAHUL-
अथिया शेट्टी आणि के एल राहुल

By

Published : May 6, 2020, 7:53 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के एल राहुल यांच्या रिलेशनची अनेकदा चर्चा ऐकायला मिळत असते. असे असले तरी दोघांनीही याला अद्याप दुजोरा दिलेला नाही.

अथिया शेट्टी आणि के एल राहुल अनेकदा एकत्र आढळून येतात. दोघे एकमेकांच्या फोटोंवर कॉमेंट्सही करीत असतात. यातून त्यांच्या नात्याचा कयास लावला जात असतो. अलिकडेच अथियाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात तिने के एल राहुलचा फोटो क्रॉप केलेले दिसतो

अथियाने सुट्टीचा एक जुना फोटो शेअर केला आहे. यात अथिया दिसत असून क्रिकेटर राहुलला क्रॉप केल्याचे दिसत आहे. फोटोत त्याचा फक्त हात दिसत आहे. फोटो शेअर करीत अथियाने लिहिलंय, 'एका स्वप्नासारखे वाटते.'

अथियाचा हा व्यवहार अनेक शंका निर्माण करणारा आहे. सोशल मीडियावर यामुळे अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. दोघांच्यात काही बिनसले तर नाही? असा सवालही उपस्थित होत आहे.

हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे जेव्हा राहुलचा वाढदिवस होता तेव्हा तिने एक सुंदर फोटो शेअर केला होता. त्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते, 'हॅप्पी बर्थ डे माय पर्सन'. या पोस्टला अनेकांनी लाईक केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details