मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री वहिदा रेहमान फेब्रुवारी महिन्यात 83 वर्षांच्या झाल्या. या वयातही त्यांचे फोटो खूप आकर्षक वाटतात. या ज्येष्ठ अभिनेत्रीने अंदमान आणि निकोबार बेटांवर जलविहार करतानाचे काही फोटो मुलीच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
ट्विंकल खन्नाला दिलेल्या मुलाखतीत वहिदा रहमान यांनी खुलासा केला होता की तिच्या यादीमध्ये स्कूबा डायव्हिंग करणे आहे. दोन वर्षाच्या आतच वहिदा रहमान यांनी आपल्या बकेट लिस्टमधील एक गोष्ट पूर्ण केली आहे.
वहिदाची मुलगी काश्वी रेखीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री वहिदा रहमान बेटावर सुट्टीचा वेळ मजेत घालवताना दिसतात. काश्वी यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये ''स्नॉर्केलिंग विथ मॉम'' असे लिहिले आहे.
वय ही संख्या आहे हे वहिदा रहमान यांनी पुन्हा सिद्ध केले आहे. ही त्यांची पहिली वेळ नाही. २०१९ मध्ये त्यांनी त्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनून भारत, टांझानिया, नामीबिया आणि केनियामध्ये प्रवास केला होता.
हेही वाचा - ‘कमांडो ४’सह फ्रँचायझीला नव्या उंचीवर नेऊ - विपुल शाह