मुंबई - अभिनेता आशुतोष राणाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने गेल्या आठवड्यातच कोरोनाची लस घेतली होती. मंगळवारी आपल्या फेसबुकवर पोस्ट लिहून आशुतोषने ही माहिती दिली आहे. स्वतः कोरोनाबाधीत झाल्यानंतर आशुतोषने घरातील इतर सदस्यांची चाचणी घेतली आहे आणि त्यांचे अहवाल उद्या येतील, असे त्याने म्हटलंय.
आशुतोष राणा आणि त्यांची पत्नी, अभिनेत्री रेणुका शहाणे यांना ६ एप्रिलला कोविड -१९ ची लस पहिल्यांदा मिळाली. रेणुका शहाणे यांनी लसीकरण केंद्रावरुन स्वत: चा एक फोटो शेअर केला होता आणि ट्विट केले होते: "कोविड लसीकरण केंद्रातील सर्व डॉक्टर आणि परिचारिकांचे विशेष आभार. आज आम्ही लसीकरणाचा पहिला डोस घेतला. लस मिळवा आणि मास्क घाला, सामाजिक अंतर ठेवा आणि आपले हात स्वच्छ ठेवा. "
आशुतोष राणा यांनी गेल्या एका आठवड्यात त्याच्या संपर्कात जे लोक आले होते त्या सर्वांना कोविड १९ ची चाचणी घेण्याची विनंती केली आहे.