महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आशा पारेख, वहीदा रहमान आणि हेलन यांनी घेतला तारुण्याचा पुनःप्रत्यय - ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख

हिंदी चित्रपटसृष्टीच्या दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, वहीदा रहमान आणि हेलन एकत्र सुट्टीचा आनंद घेत आहेत. अंदमान आणि निकोबार बेटावर आनंद घेत असताना तिघींची एक झलक एका फोटोत पाहायला मिळत आहे.

youth in Andaman
तारुण्याचा पुनःप्रत्यय

By

Published : May 11, 2021, 8:37 PM IST

मुंबई- ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, वहीदा रहमान आणि हेलन या तिघीजणी सुट्टीचा आनंद घेत आहेत. अंदमान आणि निकोबार बेटावर आनंद घेत असतानाचा एक फोटोसध्या खूप चर्चेत आला आहे.

आशा पारेख, वहीदा रहमान आणि हेलन एकत्र सुट्टीचा आनंद घेत आहेत

निर्माता तनुज गर्ग यांनी तिघीजणी सुट्टीचा आनंद घेत असतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. सोमवारी तनुजने आशा पारेख, वहीदा रहमान आणि हेलन यांचेकाही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

आशा पारेख, वहीदा रहमान आणि हेलन एकत्र सुट्टीचा आनंद घेत आहेत

"जर दिल चाहता है हा चित्रपट पुन्हा बनवायचा असेल तर या तिघींसोबत शक्य आहे. वहिदा रहमान, आशा पारेख आणि हेलन या निवृत्तीचा आनंद अंदमान आणि निकोबार बेटावर घेत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहात आहे,'' अशा अर्थाची पोस्ट तनुजने लिहिली आहे.

https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/183860461_953990508752518_1390877889485999822_n_1105newsroom_1620715205_746.jpg

यापूर्वी अंदमान आणि निकोबार बेटांवर स्नॉर्कलिंग गिअर घालून वहिदा रेहमानने अंडर वॉटर फोटोग्राफी करुन दाखवून दिले होते की वय हे फक्त आकडे आहेत.

हेही वाचा - राजधानी दिल्लीत सर्व सुविधायुक्त १०० खाटांचे रुग्णालय बांधतेय हुमा कुरेशी!

ABOUT THE AUTHOR

...view details