महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शपथविधी कार्यक्रमावेळी आशा भोसलेंच्या मदतीला धावून आल्या स्मृती इराणी - amethi

दिल्लीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला अनेक कलाकार मंडळींनीही हजेरी लावली होती. यात प्रसिद्ध गायिक आशा भोसले यांचाही समावेश होता. याच कार्यक्रमातील स्मृती इराणींसोबतचा एक फोटो आशा भोसलेंनी शेअर केला आहे.

आशा भोसलेंच्या मदतीला धावून आल्या स्मृती इराणी

By

Published : Jun 1, 2019, 2:03 PM IST

मुंबई- लोकसभा निवडणूंकामध्ये भाजपला मिळालेल्या विजयानंतर गुरूवारी मोदींच्या शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला अनेक कलाकार मंडळींनीही हजेरी लावली होती. यात प्रसिद्ध गायिक आशा भोसले यांचाही समावेश होता.

याच कार्यक्रमातील स्मृती इराणींसोबतचा एक फोटो आशा भोसलेंनी शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शनही दिलं आहे. शपथविधीनंतर याठिकाणी भयंकर गर्दी झाली होती आणि त्यात मी अडकले होते. यावेळी स्मृती इराणी वगळता कोणीही माझ्या मदतीसाठी पुढे आले नाही. इराणींनी माझी स्थिती पाहिली आणि मी सुखरूप घरी पोहोचेन याची खात्री केली. त्यांच्या याच काळजी करण्याच्या स्वभावामुळे त्या जिंकल्या, असं आशा भोसले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आशा भोसलेंच्या मदतीला धावून आल्या स्मृती इराणी

लोकसभा निवडणूकांमध्ये स्मृती इराणी यांना राहूल गांधी यांच्या विरोधात अमेठीतून उमेदवारी मिळाली होती. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमेठीत इराणी यांनी राहूल गांधीचा ५५, १२० मतांनी पराभव करत विजय मिळवला.

ABOUT THE AUTHOR

...view details