महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रामायणाच्या पुनः प्रसारणानंतर अरुण गोविल यांचे ट्विटरवर पदार्पण - अरुण गोविल यांचे ट्विटरवर पदार्पण

अरुण गोविल यांच्या या पहिल्या वहिल्या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्यांचे स्वागत केले जात आहे.

Arun Govil entry on Twitter after retelecasting Of Ramayana
रामायणाच्या पुनः प्रसारणानंतर अरुण गोविल यांचे ट्विटरवर पदार्पण

By

Published : Apr 5, 2020, 11:32 AM IST

मुंबई -दूरदर्शनवर रामानंद सागर दिग्दर्शित रामायण ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेला टी आर पी देखील चांगला मिळत आहे. आता या मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी ट्विटरवर पदार्पण केले आहे. जय श्रीराम असे ट्विट करत त्यांनी ट्विटरवर एन्ट्री घेतली.

अरुण गोविल यांच्या या पहिल्या वहिल्या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्यांचे स्वागत केले जात आहे.

सध्या कोरोनामुळे संपूर्ण देशात 21 दिवस टाळेबंदी करण्यात आली असल्यामुळे नागरिकांना विरंगुळा मिळावा या उद्देशाने 'रामायण' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या मालिकेची पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता पाहायला मिळत आहे.ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउंसिल (बीएआरसी) नुसार मागच्या आठवड्यात या मालिकेच्या 4 भागांना 170 मिलियन प्रेक्षकांनी पाहिले आहे. ही मालिका मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक वेळा पाहिली जाणारी मालिका ठरली आहे.1987-88 च्या दशकात रामायण मालिका प्रसारित झाली होती. रामानंद सागर यांनीच या मालिकेचे लेखन, दिग्दर्शन केले होते. अरुण गोवील यांच्यासोबत दीपिका चिखलिया यांनी सीता ही भूमिका साकारली होती. अरुण त्रिवेदी हे रावणाच्या भूमिकेत दिसले होते. तर, दारा सिंग यांनी हनुमानाची भूमिका साकारली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details