मुंबई - बॉलिवूडमध्ये सध्या लव्हस्टोरी पलीकडील अनेक कथा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे समाजातील वास्तवावर आधारित या कथांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही मिळताना दिसत आहे. पॅडमॅन, ओ माय गॉड यासारख्या चित्रपटांनंतर आता असाच समाजातील वास्तवावर आधारित 'आर्टिकल १५' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.
जातीव्यवस्थेमुळे होणाऱ्या अन्यायाची भयान कथा, 'आर्टिकल १५'चा ट्रेलर प्रदर्शित - article 15 trailer
समाजामध्ये सुरू असलेले गुन्हे दडपण्याचा चालू असणारा प्रयत्न मोडीत काढण्यासाठी आयुष्मानची चाललेली धडपड या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. भारताच्या संविधानातील समतेचा अधिकार या 'आर्टिकल १५' वर चित्रपटाची कथा आधारित असणार आहे.
नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये समाजामध्ये निष्पापांचे जाणारे बळी, जातीच्या नावाखाली उच्च आणि मागास अशा झालेल्या विभागणीची कथा पाहायला मिळते. तसेच याविरोधात लढणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आयुष्मान दिसत आहे.
समाजामध्ये सुरू असलेले गुन्हे दडपण्याचा चालू असणारा प्रयत्न मोडीत काढण्यासाठी आयुष्मानची चाललेली धडपड या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. भारताच्या संविधानातील समतेचा अधिकार या 'आर्टिकल १५' वर चित्रपटाची कथा आधारित असणार आहे. देशात जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारावर कोणत्याही नागरिकासोबत भेदभाव केला जाऊ शकत नाही, हेच या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे. २८ जूनला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.