आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री स्वरा भास्करने पुन्हा एकदा वाद औढवून घेतला आहे. तिने हिंदुत्वाची तुलना तालिबानशी केली आहे, ज्यामुळे #ArrestSwaraBhasker हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे आणि स्वरा भास्करच्या अटकेची मागणी केली जात आहे.
स्वरा भास्करने सोशल मीडियावर अफगाणीस्तानच्या सद्यस्थितीबाबत एक पोस्ट लिहिली आहे. स्वराने अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीची भारताशी तुलना केली. त्यामुळे काही इंटरनेट युजर्स तिचे सोशल मीडिया अकाऊंट निलंबित करण्याची मागणी करत आहेत, तर काहींनी तिच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.
स्वराने काय लिहले आहे?
स्वरा भास्करने लिहिले आहे, ''आम्ही हिंदुत्व दहशतवादाशी सहमत होऊ शकत नाही आणि तालिबानी दहशतवादामुळे आपण सर्वजण हैराण झालो आहेत... आम्ही तालिबानची दहशत सहन करु शकत नाही आणि हिंदुत्वाच्या दहशतीबद्दल आपल्याला सर्वांना राग येतो. आपली मानवी आणि नैतिक मूल्ये पीडित किंवा छळ करणार्याच्या ओळखीवर आधारित नसावीत. ''