महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अर्जुन रामपालचा 'धाकड' लूक, चमकते प्लॅटिनम केस पाहून चाहते अवाक - अर्जुन रामपालचा 'धाकड' लूक

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने आपला हेअर स्टाईलसह लूक बदलला आहे. त्याचा हा लूक आगामी कंगना रणौतची मुख्य भूमिका असलेल्या 'धाकड' चित्रपटासाठीचा आहे. ज्यामध्ये अर्जुन रामपाल व्हँप रुद्रवीरची भूमिका साकारत आहे.

Arjun Rampal
अर्जुन रामपालचा 'धाकड' लूक

By

Published : Jun 18, 2021, 8:55 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने आपल्या नवीन इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नवी केशरचना आणि चमकत्या रंगाच्या केसांचा लूक शेअर केला आहे. त्याचा हा लूक आगामी कंगना रणौतची मुख्य भूमिका असलेल्या 'धाकड' चित्रपटासाठीचा आहे. ज्यामध्ये अर्जुन रामपाल व्हँप रुद्रवीरची भूमिका साकारत आहे.

अर्जुनने हेअर स्टाइलिस्ट अलिम हकीमला आपला नवीन लूक तयार करण्याचे श्रेय दिले. अर्जुन रामपालने 'धाकड' चित्रपटाचे दिग्दर्शक रजनीश घई यांच्यासाठीही एक पत्र लिहिले आहे.

अर्जुनने लिहिले की, “चित्रपटाचा मी एक आव्हानात्मक भाग आहे. त्यामुळे मला पत्र पाठवणे आवश्यक आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी माझे बंधू अलीम आणि माझे स्वप्न साकार करण्यात मदत केल्याबद्दल रजनीश घई यांचे आभार. हॅशटॅग धाकड."

अर्जुनच्या पोस्टवर भाष्य करताना चाहत्यांनी व्यक्त केले की अभिनेता अर्जुन त्याच्या नवीन अवतारात 'हॉट' दिसत आहे आणि लूक देखील ट्रेंड सेट करू शकेल अशी सूचना त्याने केली आहे.

'धाकड' या स्पाय थ्रिलर फिल्मशिवाय अर्जुन रामपाल 'द बैटल ऑफ भीमा कोरेगांव' या ऐतिहासिक चित्रपटातही दिसणार आहेत. रमेश थेटे दिग्दर्शित या चित्रपटात अर्जुन योद्धा सिद्धनक महार इनामदारच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात सनी लिओनही दिसणार आहे.

हेही वाचा - निर्माता रमेश तौरानी यांची फसवणूक, त्यांच्या ३५६ कर्मचाऱ्यांना दिले ‘फेक वॅक्सीन’?

ABOUT THE AUTHOR

...view details