महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आपण प्रेमात असताना आदर विसरतो - अर्जुन कपूर

‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट अलिकडेच डिजीटली रिलीज झाला होता. हा चित्रपट प्रेमामुळे गुंतागुंत नसलेल्या “वास्तववादी” जगाचे चित्रण करण्याचा प्रयत्न करतो. दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित या चित्रपटात प्रणयरम्य आणि त्याहून अधिक महत्व दिल्याचे अर्जुन कपूरने म्हटलंय.

By

Published : Jun 1, 2021, 8:54 PM IST

Arjun Kapoor
अर्जुन कपूर

मुंबई- पुरुष आणि स्त्रीमधील प्रत्येक रिलेशन हे रोमान्सचे असत नाही, असे अभिनेता अर्जुन कपूर याने म्हटले आहे. अलिकडेच त्याचा संदिप और पिंकी फरार हा चित्रपट डिजीटली रिलीज झाला होता. हा चित्रपट प्रेमामुळे गुंतागुंत नसलेल्या “वास्तववादी” जगाचे चित्रण करण्याचा प्रयत्न करतो. दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित या चित्रपटात प्रणयरम्य आणि त्याहून अधिक महत्व दिल्याचे अर्जुन कपूरने म्हटलंय.

"कलाकार म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की आम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे, हा चित्रपट त्या जगात खरोखर वास्तववादी लिहिला गेला होता. जेव्हा आपण कथेमध्ये प्रणय ठेवतो तेव्हा बर्‍याच गोष्टींचा विरोधाभास होतो, केमेस्ट्री जमण्यावर लक्ष केंद्रीत केले जाते, असेही अर्जुन कपूरने सांगितले.

"पुरुष आणि स्त्रियांच्या भावना आणि नातेसंबंध वेगवेगळ्या भागात अस्तित्त्वात आणायला हवेत. परंतु परस्पर आदर असला पाहिजे. या चित्रपटात प्रेमाचा आदर केला आहे. बर्‍याच वेळा प्रेमात असताना आपण आदर विसरतो," असे अर्जुनने सांगितले.

संदीप और पिंकी फरार या चित्रपटात परिणीती चोप्राने बँक एक्झीक्यूटिंव्ह संदिप ही व्यक्तीरेखा साकारली आहे आणि सतेंद्र दहिया उर्फ ​​पिंकी ही निलंबित पोलिसाच्या भूमिकेत अर्जुन दिसला आहे. २० मे रोजी डिजिटल रिलीज झालेल्या या चित्रपटामध्ये लिंग आणि वर्गाच्या थीम्सचा शोध घेण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा बॅनर्जी आणि वरुण ग्रोव्हर यांनी एकत्रित लिहिली आहे.

हेही वाचा - चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढविणारा विद्या बालनच्या ‘शेरनी’चा टिझर झाला प्रदर्शित!

ABOUT THE AUTHOR

...view details