मुंबई- मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही जोडी गेल्या काही दिवसांपासून आपल्या चित्रपटांहूनही अधिक रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. अरबाज खानसोबतच्या घटस्फोटानंतर मलायका अर्जुन कपूरला डेट करत असून अनेकदा हे दोघं एकत्र स्पॉट होत असतात.
हेही वाचा - अक्षयला भेटण्यासाठी ९०० किलोमीटर पायी आला चाहता, खिलाडीनं शेअर केला व्हिडिओ
नुकतंच मलाकानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. जो बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने काढला केला आहे. तिच्या या फोटोवर संजय कपूर यांनी कमेंट केली आहे. तुझा फोटोग्राफर खूप चांगलं काम करत आहे, अशी कमेंट करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या हा फोटो अर्जुनने काढला असल्याचं स्पष्ट केलं आहे.
तर संजय यांच्या या कमेंटवर दिग्दर्शक पुनित मल्होत्रानंही सहमती दर्शवत, हसणारं इमोजी शेअर केलं आहे. अर्जुन आणि मलायकाच्या नात्यावर कमेंट करण्याची संजय कपूर यांची ही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा त्यांनी दोघांवर कमेंट केली आहे. मात्र, अर्जुन आणि मलायकानं आतापर्यंत आपल्या नात्याविषयी अधिकृत घोषणा केली नाही.
हेही वाचा - हृतिक-टायगरच्या 'वॉर'चं चित्रीकरण पूर्ण, पाहा व्हिडिओ