मुंबई - सुशांतसिंह राजपूतच्या जाण्यानंतर फिल्म इंडस्ट्रीतील अनेक रहस्ये उलगडत आहेत. नेपोटिझ्मच्या मुद्द्यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. अशात लेखक चेतन भगतचा एक जुना ट्विट व्हायरल झाला आहे. यात त्याने आपल्या कादंबरीवर हाफ गर्लफ्रेंड सिनेमा बनत असल्याचे म्हटले होते. यात त्याने मुख्य भूमिका सुशांतसिंह राजपूत साकारणार असल्याचे म्हटले होते. मात्र जेव्हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा यात ही भूमिका अर्जुन कपूरने साकारली होती.
बुधवारी हॅशटॅग अर्जुन आणि हॅशटॅग हाफ गर्लफ्रेंड हा ट्रेंड जोरात आहे. युजर्सनी सुशांतचा चित्रपट अर्जुनने पळवल्याचा आरोप केला आहे. बॉलिवूडमधील घराणेशाहीमुळेच हे घडल्याचे युजर्सनी म्हटलंय. यासाठी युजर्सनी चेतन भगतच्या पाच वर्षापूर्वीच्या ट्विटचा आधार घेतलाय.