महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सुशांतसोबतचा शेवटचा मेसेज अर्जुन कपूरने शेअर करीत लिहिली ह्रदयस्पर्शी पोस्ट - सुशांतसोबतचा शेवटचा मेसेज

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर अनेकांना दुःख झालंय. सुशांतला लहान वयातच मातृशोक सहन करावा लागला होता. याचे शल्य त्याच्या मनता कायम होते हे त्याच्या शेवटच्या पोस्टवरूनही लक्षात येते. अभिनेता अर्जुन कपूरची आईदेखील त्याला अर्ध्यावरच सोडून गेली होती. आई जाण्याचे दुःख किती मोठे असते याची जाणीव त्याला आहे. सुशांत आणि अर्जुन यांच्यात सोशल मीडियावर एक चॅट झाला होता. त्याचा संदर्भ देत अर्जुनने एक पोस्ट लिहिली आहे.

Arjun and Sushant
अर्जुन आणि सुशांत

By

Published : Jun 15, 2020, 6:33 PM IST

मुंबई - सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने संपूर्ण फिल्म इंडस्ट्री दुःखी झाली आहे. बॉलिवूड सेलेब्रिटींनी सोशल मीडियावरुन आपल्या दुःखाला वाट करुन दिलीय. अशात अभिनेता अर्जुन कपूर याने लिहिलेली पोस्ट सर्वांना चकित करणारी आहे. त्याने सुशांतसोबत झालेल्या चॅटचा एक स्क्रीन शॉट सोशल मीडियावर शेअर केलाय. ही बातचीत त्यांची १८ महिन्यांपूर्वीची आहे.

अर्जुनने लिहिलंय, ''माझी आणि सुशांत सिंहची ही शेवटची बातचीत होती. केदारनाथ चित्रपटाच्या रिलीजनंतर त्याने आपल्या आईच्या आठवणीत पोस्ट लिहिली होती. सुशांत आपल्या आईचे नेहमी स्मरण करीत असे. फिल्म रिलीजनंतर सर्वजण आनंद साजरा करीत होते, मात्र सुशांतचे मन रिकामे होते. आम्ही एक दुसऱ्यासोबत इव्हेन्ट्स, स्क्रीनिंगला भेटलो, परंतु आमच्यात जास्त बोलणे झाले नाही.''

अर्जुनने पुढे लिहिलंय, ''सुशांतने जे मोठे पाऊल उचलले त्याच्या मागच्या भावना मी समजू शकतो. मीदेखील या प्रकारातून गेलो आहे. मलाही माझी आई हरवल्यानंतर दुःख झाले होते. आईच्या जाण्याने माझ्यात रितेपण जाणवत होते.'' ''तू आता आराम कर माझ्या भावा, तुला शांती मिळेल आणि समाजाला शिकवण मिळेल, अशी अपेक्षा करतो.''

हेही वाचा - सुशांतसिंहचा मृत्यू आत्महत्या नसून तो सुनियोजित मर्डर - कंगना रनौत

सुशांत सिंह राजपूतच्या आईचे निधन झाले तेव्हा तो १६ वर्षांचा होता. तो आईच्या अत्यंत जवळच होता. त्याला आई हरवल्याचे मोठे दुःख झाले होते. त्याने आपली शेवटची पोस्टही आईलाच लिहिली होती. सोशल मीडियावर तो नेहमी आईच्या आठवणीत रमलेला असायचा. गेल्या सहा महिन्यांपासून तो डिप्रेशनमध्ये होता आणि त्याच्यावर उपचारही सुरू होते.

ABOUT THE AUTHOR

...view details