मुंबई- अभिनेता अर्जून कपूर लवकरच 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उद्या म्हणजेच गुरूवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला जाणार आहे. दरम्यान या ट्रेलर प्रदर्शनाआधी अर्जूनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ट्रेलरची झलक शेअर केली आहे.
अर्जूनने शेअर केली 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'ची झलक, उद्या ट्रेलर होणार प्रदर्शित - trailer \
कोणालाही माहित नसलेल्या त्या हिरोंची कथा आता जगासमोर येणार आहे. इंडियाज मोस्ट वॉन्टेडच्या ट्रेलरमधून पाहा त्या टीमची कथा ज्यांनी ओसामाला पकडले, असे शीर्षक अर्जूनने या व्हिडिओला दिले आहे
कोणालाही माहित नसलेल्या त्या हिरोंची कथा आता जगासमोर येणार आहे. इंडियाज मोस्ट वॉन्टेडच्या ट्रेलरमधून पाहा त्या टीमची कथा ज्यांनी ओसामाला पकडले, असे शीर्षक अर्जूनने या व्हिडिओला दिले आहे. अॅक्शन आणि क्राईम थ्रिलर असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केले आहे. तर फॉक्स स्टार स्टुडिओज अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
२४ मे २०१९ ला हा चित्रपट चित्रपटगृहात झळकणार आहे. आता या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून अर्जूनचे चाहते या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत.