मुंबई- 'इश्कजादे' फेम अभिनेता अर्जून कपूर लवकरच 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. यानंतर आता अर्जूनने चित्रपटातील आणखी एक झलक शेअर केली आहे.
अर्जूनने शेअर केली 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'ची झलक, २४ मे ला होणार प्रदर्शित - movie
भारतावर होणाऱ्या हल्ल्यात अनेक निष्पापांचे जाणारे जीव थांबवण्यासाठी ५ लोकांच्या टीमने उचलेलं पाऊल आणि सर्वात क्रुर गुन्हेगार ओसामाला पकडण्यासाठी कोणत्याही हत्यारांविना चाललेली या टीमची धडपड, या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
१५ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये बॉम्बस्फोट आणि निष्पाप जिवांचा जाणारा बळी याची झलक पाहायला मिळते. भारतावर होणाऱ्या हल्ल्यात अनेक निष्पापांचे जाणारे जीव थांबवण्यासाठी ५ लोकांच्या टीमने उचलेलं पाऊल आणि सर्वात क्रुर गुन्हेगार ओसामाला पकडण्यासाठी कोणत्याही हत्यारांविना चाललेली या टीमची धडपड, या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केले आहे. तर फॉक्स स्टार स्टुडिओज अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. २४ मे २०१९ ला हा चित्रपट चित्रपटगृहात झळकणार आहे.