महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अर्जुन कपूर झाला कोरोनामुक्त, ओढ कामावर परतण्याची - अर्जुन कपूरची कोविड चाचणी निगेटिव्ह

अभिनेता अर्जुन कपूर याने आपली कोविड चाचणी निगेटिव्ह आल्याचे चाहत्यांना कळवले आहे. लवकरच कामावर परतण्यासाठी उत्सुक असल्याचे त्याने बुधवारी सांगितले.

Arjun Kapoor
अर्जुन कपूर

By

Published : Oct 7, 2020, 1:12 PM IST

मुंबई: अभिनेता अर्जुन कपूरला महिन्यापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर तो अलगीकरणात राहून उपचार घेत होता. बुधवारी त्याने चाहत्यांसाठी चांगली बातमी दिली आहे. आपली चाचणी निगेटिव्ह आल्याचे त्याने चाहत्यांना कळवले आहे.

अर्जुनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून ही बातमी दिली आहे. त्याने लिहिले आहे की, ''हाय, मला कळवण्यास आनंद वाटतो की, आठवड्याच्या अखेर झालेल्या कोरोना चाचणीमध्ये माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.''

अर्जुनने म्हणतो, “पूर्णतः बरा झालो असल्याने छान वाटत आहे आणि कामावर परतण्यासाठी उत्सुक आहे. तुम्ही दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार.''

अर्जुनने सर्वांना कोरोना व्हायरसपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. त्याने लिहिलंय, ''हा आजार गंभीर आहे आणि प्रत्येकाने याला गंभीरपणे घेतले पाहिजे. लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की, याची लागण तरुण आणि वृद्ध कोणालाही होऊ शकते. तेव्हा प्रत्येकवेळी मास्क वापरा. बीएमसीने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार. आमची काळजी घेणाऱ्या सर्व आघाडीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सलाम. आम्ही तुमचे कायमचे ऋणी आहोत. "

अर्जुन कपूरने ६ सप्टेंबर रोजी इन्स्टाग्रामवर लिहिले होते की, त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तो एसिम्प्टोमॅटिक होता आणि त्याने स्वत: ला घरी क्वारंटाइन केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details