मुंबई- अर्जुन कपूर नेहमीच आपल्या खासगी आयुष्याची चर्चा उघडपणे फारसा कधी करीत नाही. त्याने पहिल्यांदाच आपल्याहून वयाने जास्त असलेल्या व्यक्तीशी असलेल्या प्रेम संबंधाबद्दल आणि वडिलांच्या लग्नाच्या निर्णयाबद्दल पूर्वी व्यक्त केलेल्या मतांविषयी एका मुलाखतीत भाष्य केले आहे.
'सरदार का ग्रँडसन' या चित्रपटाच्या रिलीजबाबत तो बोलत होता. अर्जुनने आपल्याहून १२ वर्षे वयाने जास्त असलेल्या मलायका आणि अरबाज खानपासून जन्मलेला १८ वर्षे वय असलेला तिचा मुलगा अरहान खान यांच्याबद्दल सांगितले.
आपल्या वैयक्तिक आयुष्यविषयी बोलताना अर्जुन म्हणाला, "मी प्रयत्न करत नाही आणि माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी स्पष्टपणे बोलतोय, कारण मला असं वाटतं की तुमच्या जोडीदाराचा आदर केला पाहिजे. प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो. मी ती स्थिती पाहिली आहे जेव्हा काही गोष्टी सार्वजनिक होणे योग्य नव्हते, कारण याचा परिणाम मुलांच्यावर होतो.''
अर्जून पुढे म्हणाला, ''मला मर्यादा आखणे योग्य वाटते. मी तेच करतो ज्यात तिला सहज वाटेल आणि माझे करियर यासर्वांमध्ये अडकणार नाही यासाठी सीम असणे आवश्यक आहे.''
तो पुढे म्हणाला, ''आज मी याबद्दल बोलतोय कारण मी या नात्याला एक योग्य सन्मान दिला आहे. मी या नात्याला स्वातंत्र्यही दिले आहे आणि यासाठी वेळ देऊन याचा मान वाढवला आहे." गेल्या काही दिवसापासून अर्जुन आणि मलायकाच्या विवाहाची चर्चा होत होती.
त्याच मुलाखतीत अर्जुनने आपले वडील बोनी कपूर यांच्याशी असलेले मतभेद आणि तो वयाच्या 35 व्या वर्षी वडिलांसोबत एकाच घरात का राहिला नव्हता याबद्दल तो कसा विचार करत होता याबद्दल सांगितले.
"माझ्या वडिलांनी जे केले ते ठीक आहे असे मी म्हणू शकत नाही, कारण लहान असताना मला त्याचा परिणाम जाणवला होता, परंतु आता मला ते समजले आहे. "ठीक है, होता है" असे मी म्हणू शकत नाही. कारण मला नेहमीच आश्चर्य वाटले. पण जेव्हा जेव्हा मी स्वतःच्या नात्यातील तणावाची स्थितीचा वयस्कर म्हणून विचार करतो, तेव्हा ते तुम्हाला समजते." असे अर्जुन म्हणाला.
वडीलआणि आणि बहिणींसोबत अर्जुन कपूर
अर्जुन म्हणाला, "माझ्या आईने केलेले संगोपन आणि संस्कार माझ्या नीट लक्षात आहेत. ती मला सांगायची काहीही होवो, कोणतीही परिस्थिती येवो आपल्या वडिलांच्यासोबत ठाम उभे राहायचे. आई म्हणाली होती की पापाने जे काही जो काही निर्णय घेतलाय तो प्रेमामुळे घेतलाय. त्यांना आयुष्यात दुसऱ्यांदा प्रेम झाल्याबद्दल मी पापांचा आदर राखतो. आज आपण २०२१ मध्ये बसून म्हणतो, की एकदाच प्रेम होते तर आम्ही मुर्ख आहोत. या सर्व बॉलिवूडच्या गोष्ट आहेत.वास्तवामध्ये प्रेम ही खूप गुंतागुंतीची गोष्ट आहे. प्रेमाचा अर्थ नेहमी प्रेमातच अडकून पडणे असे नाही."
या नंतर अर्जुन कपूर आगामी हॅरॉर-कॉमेडी 'भूत पोलिस' या चित्रपटात दिसणार आहे ज्यात जॅकलिन फर्नांडिज आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत आहेत. पवन कृपालानी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती रमेश तोरानी आणि अक्षय पुरी यांनी केली आहे.
हेही वाचा - प्रख्यात संगीतकार लक्ष्मण उर्फ विजय पाटील काळाच्या पडद्याआड