महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अर्जुन कपूर: प्रत्येकाने हळूहळू आपले जीवन रीसेट करायला सुरुवात केली पाहिजे - अर्जुन कपूरने केले सऊटिंग

अर्जुन कपूरने एका जाहिरातीच्या शूटिंगमध्ये भाग घेतला. सगळ्यांच्या सहकार्यामुळे शूटिंग करणे सोपे झाल्याचे तो म्हणाला. सुरक्षिततेचे सर्व उपाय सेटवर योजन्यात आले होते, त्यामुळे शूटिंग करणे सहज शक्य झाले.

arjun kapoor
अर्जुन कपूर

By

Published : Jul 11, 2020, 1:11 PM IST

मुंबई- अभिनेता अर्जुन कपूरने चार महिन्यानंतर पहिल्यांदाच कॅमेऱ्याशी सामना केला. त्याने एका जाहिरातीच्या शूटिंगमध्ये सहभाग घेतला. सर्वांच्या मदतीमुळे शूटिंग सोपे झाल्याची प्रतिक्रिया त्याने दिली.

अर्जुन म्हणाला, "मला वाटतं आपल्या पैकी प्रत्येकजण सर्व गोष्टी सुरळीत व्हाव्यात यासाठी तडजोड करीत असतो. बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. मात्र आपल्याला काम करायला पाहिजे, आपल्याला कुटुंबियांना पाठिंबा दिला पाहिजे."

"त्यामुळे प्रत्येकाने आपल्या भोवतीचे वातावरण शक्य तितके सुरक्षित बनवले पाहिजे, त्यामुळे आपे संरक्षण होईल आणि कामात सुरळीतपणा येईल. मी चार महिन्यानंतर शूट केले," असे अर्जुन पुढे म्हणाला. सेटवर असलेल्या सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजनांमुळे शूट करणे सोपे गेल्याचे अर्जुन म्हणाला.

"मला हे मान्य करावेच लागेल की सुरुवातीला मी थोडासा त्रासात होता. परंतु सर्व सुरक्षेच्या उपाययोजना जागोजागी पाहून मी काहीच वेळात एकदम ठीक झालो. स्वाभाविकच, पुन्हा कामासाठी बाहेर पडताना सुरुवातीचे दिवस सर्वांना थोडे अवघड जातील. परंतु, आज मी शूटिंग व सेटवर लोकांच्या आसपास राहण्याचा अधिक आत्मविश्वास बाळगतो कारण सेट्सवर सुरक्षिततेचे उच्चतम उपाय आहेत. याची खात्री करण्यासाठी व्यापक तयारी मी पाहिली आहे," असे तो म्हणाला.

पुढच्या काळात अर्जुनने बर्‍याच शूटिंगसाठी तारखांचे नियोजन केले आहे. "काम पुन्हा सुरू करणे खूप चांगले वाटले आणि मी पुढील शूटिंगच्या दिवसांची अपेक्षा करीत आहे," असेही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा - दिल बेचारा टायटल ट्रॅक : सुशांतच्या नृत्यावर आणि हास्यावर नेटिझन्स फिदा

अर्जुनशिवाय, तापसी पन्नू, विद्या बालन आणि आयुष्मान खुराना या कलाकारांनीही लॉकडाऊननंतर सेटवर पाऊल ठेवले आहे. अभिनेता आयुष्मान खुराना नुकताच चंदिगडमध्ये एका जाहिरातीसाठी चित्रीकरण करण्यात आला असताना, शूटिंग पुन्हा सुरू करणारी तापसी बॉलिवूडच्या पहिल्या स्टार कलाकारांपैकी एक होती.

काही दिवसांपूर्वी टीव्ही स्टार्स अनिता हसनंदानी आणि निया शर्मा यांचे नागीन-4 च्या फिनालेसाठी शूटिंग करण्यात आले होते. अनेक चित्रपट प्रॉडक्शन हाऊसेसने जाहीर केले आहे की आगामी काही महिन्यांत शूटिंग पुन्हा सुरू होईल. अक्षय कुमार अभिनीत बेल बॉटम ऑगस्टमध्ये फ्लोअरवर जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details