महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Aarchi Parsha Dinner Date : आर्ची परश्याच्या डिनर डेटमुळे प्रेम प्रकरणाची कुजबुज वाढली

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या या डिनर डेटचे ( Rinku Rajguru and Akash Thosar Dinner Date ) काही फोटो आकाशने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते. हे फोटो पाहून ते एकमेकांना डेट तर करत असल्याची कुजबुज सोशल मीडियात सुरू झाली आहे.

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर
रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर

By

Published : Feb 2, 2022, 1:05 PM IST

Updated : Feb 2, 2022, 1:44 PM IST

मुंबई - नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचलेली जोडी म्हणजे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर ( Rinku Rajguru and Akash Thosar ) . सैराटची ही हिट जोडी आर्ची आणि परशा ( Archie and Parsha )याच नावानेच ओळखली जाते. नुकतेच ते डिनरसाठी एकत्र भेटले होते. त्यांच्या या डिनर डेटचे काही फोटो आकाशने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते. हे फोटो पाहून ते एकमेकांना डेट तर करत असल्याची कुजबुज सोशल मीडियात सुरू झाली आहे.

आकाशने सोशल मीडियावर एक व्हिडिओही शेअर केला होता. त्यात तो मोबाईलमध्ये पाहात असून त्याने डोक्यावर केस बांधलेले दिसतात. मागून रिंकू गजरा घेऊन त्यांच्या केसांना माळते असे हे रिल होते. दुसऱ्या एका व्हिडिओत दोघेही कारमध्ये दिसत आहेत. त्यांचे हे रिल आणि फोटो हे कोणत्यातरी चित्रपटाचे प्रमोशन आहे का याचीही शंका व्यक्त केली जातेय.

यापूर्वीही आकाश आणि रिंकु अनेकवेळा एकत्र फोटो शेअर करताना दिसले आहेत. सैराट चित्रपटमुळे त्यांच्यात चांगले नाते तयार झाले आहे. त्यानंतर दोघेही शुटिंगमध्ये बिझी असतात. सैराटनंतर ते पुन्हा एकत्र आलेले नाहीत. त्यामुळे आगामी काळात ते एकत्र काम करतील अशी चाहते प्रतीक्षा करीत असतील.

दरम्यान, नागराज मंजुळे यांचा झुंड हा चित्रपट ४ मार्च रोजी रिलीज होणार असून यात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातही आकाश ठोसर आणि रिंकु राजगुरू काम करीत आहेत. त्यांची भूमिका काय आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

हेही वाचा -प्रभास पूजा हेगडेचा बहुप्रतीक्षित 'राधे श्याम'ची रिलीज तारीख ठरली

Last Updated : Feb 2, 2022, 1:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details