चेन्नई - सुशांत सिंह राजपूतचे जाणे अनेकांसाठीच जिव्हारी लागणारे होते. सुशांत आता आपल्यात नाही, यावर त्याच्या चाहत्यांना अजूनही विश्वास बसत नाही. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा धक्का पचवू न शकल्याने तामिळनाडूमधील कोईम्बतूर येथे त्याच्या चाहत्याने गळफास लावून आत्महत्या केली होती.
मुळचा राजस्थानाचा असलेल्या एका 20 वर्षीय तरुणाने कोईम्बतूर येथील एका हॉलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी हॉलमध्ये त्याचा देह लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. "मी सुशांत भाईच्या मार्गावर चालत आहे." असे लिहिलेले एक पत्र पोलिसांना सापडले आहे.