मुंबई -बॉलीवूड अभिनेता अपारशक्ती खुराना याने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओ द्वारे एकात्मतेचा संदेश देण्यात आला आहे.
आपल्या देशात आजही काही वेळा धार्मिक वाद निर्माण होत असतात. समज गैरसमज यामधून हे वाद वाढत जातात. मात्र, आपण सर्व एक आहोत. आपला देश एक आहे, असा संदेश या व्हिडिओतून देण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये काही दिग्गज व्यक्तिमत्त्वांचे उदाहरण देण्यात आले आहे. यामध्ये एपीजे अब्दुल कलाम, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, नर्गिस, मोहम्मद रफी यांचा समावेश आहे. या व्हिडिओतून लोकांची मानसिक वृत्ती बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, अपारशक्ती लवकरच आशीष आर्यन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या 'कानपुरिये' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय 'हेल्मेट' या चित्रपटातही त्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. तसेच, तापसी पन्नूसोबत तो 'रश्मी रॅकेट' या चित्रपटातही झळकणार आहे.