मुंबई- अभिनेता आयुष्यामान खुराणा ड्रीम गर्ल या सिनेमातून आज प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात त्यानं रामाच्या सितेपासून कॉल सेंटरमध्ये मुलीच्या आवाजात बोलण्यापर्यंत अनेक निरनिराळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या या सिनेमावर आता भाऊ अपारशक्तीनं प्रतिक्रिया दिली आहे.
आईला नेहमीच मुलगी हवी होती, ड्रीम गर्ल पाहून तिला नक्कीच आनंद होईल - अपारशक्ती - ayushmann khurana latest movie
माझ्या आईला नेहमीच आपल्याला एक मुलगी असावी, अशी इच्छा होती. मात्र, तिला दोन्ही मुलंच झाली. त्यामुळे, माझ्या मते, आयुष्मान भैयाला पुजाच्या भूमिकेत पाहून तिला नक्कीच आनंद होईल, अशी पोस्ट अपारशक्तीनं लिहिली आहे.
चित्रपट खूप आवडला. संपूर्ण टीमचं अभिनंदन. दुसरी गोष्ट म्हणजे, माझ्या आईला नेहमीच आपल्याला एक मुलगी असावी, अशी इच्छा होती. मात्र, तिला दोन्ही मुलंच झाली. त्यामुळे, माझ्या मते, आयुष्मान भैयाला पुजाच्या भूमिकेत पाहून तिला नक्कीच आनंद होईल, अशी पोस्ट अपारशक्तीनं लिहिली आहे.
या पोस्टसोबतच त्याने आयुष्मानसोबतचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. दरम्यान, ड्रीम गर्लशिवाय आयुष्मान लवकरच बाला सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर अपारशक्ती कार्तिक आर्यनच्या पती पत्नी और वो सिनेमात झळकणार आहे.