मुंबई- 'साहो' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा रिलीज दिवस अखेर उजाडला आहे. अनेक भाषांमध्ये रिलीज झालेला हा सिनेमा अनेक विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. यापैकी एक विक्रम तर आंध्र प्रदेश सुरू झाला आहे. ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या एक आठवड्यात 'साहो'चे रात्रंदिवस शो चालणार आहेत.
'बाहुबली'मुळे देशभर परिचित झालेल्या प्रभासचा उदय तेलुगु फिल्म इंडस्ट्रीमध्ये २००२ मध्येच झाला होता. 'ईश्वर' या चित्रपटातून त्याने पदार्पण केले आणि त्याच्या नावामागे वलय निर्माण होत गेले. आजवर त्याचे १९ चित्रपट हिट झाले आहेत. 'रिबेल स्टार' अशी ओळख असलेला प्रभास तेलुगु इंडस्ट्रीतील 'बाहुबली' अभिनेता बनलाय. त्याचे मुळ गांव आंध्र प्रदेशमध्ये असल्यामुळे या राज्याने 'साहो'साठी शोच्या वेळात खास सवलत जाहीर केली आहे.
प्रभासच्या चाहत्यांनी आंध्र सरकारकडे 'साहो'चे शो रात्रीही चालू ठेवण्याची विनंती केली. यावर सरकारने सकारात्मक विचार करीत त्याला संमत्ती दिली आहे. त्यामुळे रात्री १२ नंतर 'साहो'चे शो सुरू राहतील व हे खास शो रात्रंदिवस चालतील.