मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली लवकरच आई वडिल होणार आहेत. अनुष्का नियमितपणे योगाभ्यास करीत असते. तिने योग करीत असतानाचा एक जुना फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यात ती विराटच्या मदतीने शीर्षासन करताना दिसत आहे.
अनुष्का शर्माने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "या व्यायामात हात पाय खाली करणे सर्वात कठीण आहे. कारण योग हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा भाग आहे, तेव्हा डॉक्टरांनी मला सर्व काही करण्याचा सल्ला दिला. जे मी गर्भवती होण्यापूर्वी करत होते ते सर्व व्यायाम करण्याची मुभा मला डॉक्टरांनी दिली आहे. शीर्षासन जे मी काही वर्षापासून करीत आले आहे. मी विचार केला की भिंतीचा आधार घेईन परंतु मला पतीने यासाठी मदत केली. हे माझ्या योग शिक्षिकेच्या देखरेखीखाली पार पडले.''
हेही वाचा - गुरुनानक जयंती निमित्त देओल परिवाराने केली 'अपने २' ची घोषणा