महाराष्ट्र

maharashtra

कोविड मदत निधीसाठी अनुष्का आणि विराटने ठेवले ११ कोटींचे लक्ष्य

By

Published : May 13, 2021, 6:17 PM IST

बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहलीने आपल्या कोविड मदतीचे लक्ष्य ११ कोटी इतके वाढवले आहे. कोविड विरुध्दच्या लढाईसाठी या दांपत्याने निधी उभा केला असून यात मदत करण्याचे आवाहन काही दिवसापूर्वी केले होते.

Bollywood star Anushka Sharma
अनुष्का आणि विराटची कोरोनासाठी मदत निधी

मुंबई - कोरोना व्हायरस विरोधातील लढाईसाठी असंख्य लोक देशासाठी दान देण्यासाठी पुढे आले असताना बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा आणि तिचा क्रिकेटपटू पती विराट कोहलीने कोविड -१९ रिलीफमध्ये मदत करण्याचे लक्ष्य वाढवून ११ कोटी केले आहे.

अनुष्काने निधी गोळा करणार्‍याचे लक्ष्य वाढविण्याची घोषणा ट्विटरवरुन केली आहे.

तिने लिहिले, "भारतातील कोरोना साथीचा सामना करण्यासाठीच्या प्रयत्नांना बळ मिळावे यासाठी विराट आणि मी एमपीएल स्पोर्ट्स फाउंडेशनचे आभार मानते. तुम्ही दान केलेल्या ५ कोटीमुळे आम्ही आमचे लक्ष्य वाढवून ११ कोटी केले आहे."

अनुष्का आणि विराटची कोरोनासाठी मदत निधी

यापूर्वी या सेलिब्रिटी जोडप्याने ७ कोटी रुपये जमा करण्याच्या उद्देशाने निधी उभारणीचे अभियान सुरू केले होते.

कोविड -१९च्या दुसर्‍या लाटेवर मात करण्यासाठी, या संकटाला तोंड देण्यासाठी काही लोक पुढाकार घेत आहेत. अनुष्का आणि विराटने पुढाकार घेऊन निधी उभा करण्यास सुरुवात केली. त्याला आता उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा - राष्ट्रीय पुरस्कार विजेती "तेंडल्या" चित्रपटाची टीम कर्ज फेडण्यासाठी करतेय शेती

ABOUT THE AUTHOR

...view details