हैदराबाद: अभिनेत्री-निर्माता अनुष्का शर्माला पुन्हा सोशल मीडियाच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. आज भारतीय क्रिकेट संघाचा डाव अवघ्या ३६ धावामध्ये गुंडाळला होता. सर्वात कमी धाव करण्याचा हा विक्रम ठरला आहे. टीमच्या खराब कामगिरीनंतर अनुष्काला ट्रोल करणे हे आता द्वेषभावनाचे प्रमाण ठरले आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेड ओव्हल येथे शनिवारी भारतातील सर्वात कमी कसोटी डावात धावा करण्याचे श्रेय अनुष्काला देण्यात आले आहे. ट्विटरवर ही अभिनेत्री ट्रेंड करत आहे आणि त्याचप्रमाणे क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्माही आहेत. हे तीन जण ट्रोलर्ससाठी एक लक्ष्य बनले आहेत.
विराटवरही होतेय टीका
शनिवारी भारतीय संघाचे खेळाडू वाईट प्रकारे अयशस्वी झाल्यानंतर नेटिझन्सना मीमपासून ते विडंबन असणाऱ्या वन-लाइनरपर्यंत फिल्ड डे आहे. 'पाताल लोक' या बेव सिरीजची निर्माती असलेल्या अनुष्कावर ट्विटरवरुन द्वेशपूर्ण टीका केली जात आहे. अनेकजण विराटला पितृत्वाची रजा घेतल्याबद्दल टीका करीत आहेत
अनुष्काचे समर्थकही आलेत पुढे