मुंबई- अभिनेत्री अनुष्का शर्माने सर्वांना विनंती केली आहे, की पृथ्वीवरील वनस्पती आणि प्राण्यांनाही माणसांप्रमाणेच वागणूक द्या. प्राणी आणि वनस्पतीदेखील निसर्गाचा एक भाग आहेत. त्यामुळे, आपण त्यांच्यासोबत दयाळूपणे आणि समानतेने वागणे गरजेचं आहे, असं अभिनेत्री म्हणाली.
प्राणी-वनस्पतीदेखील निसर्गाचा भाग, अनुष्काने चाहत्यांना केली 'ही' विनंती - latest news of anushka sharma
5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन आहे. याच निमित्ताने अभिनेत्रीने लोकांना विनंती केली, की प्राणी आणि वनस्पतींबद्दल सहानुभूती दाखवा. ती पुढे म्हणाली, "माझी इच्छा आहे की, आपण सर्वांनी त्यांच्याकडे केवळ एक साधन म्हणून पाहू नये.कारण, शेवटी आपण सर्व एकच आहोत.
5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन आहे. याच निमित्ताने अभिनेत्रीने लोकांना विनंती केली, की प्राणी आणि वनस्पतींबद्दल सहानुभूती दाखवा. ती पुढे म्हणाली, "माझी इच्छा आहे की, आपण सर्वांनी त्यांच्याकडे केवळ एक साधन म्हणून पाहू नये. कारण, शेवटी आपण सर्व एकच आहोत. मी हवामानाचा योद्धा आहे. आपण आहात का?, असा सवाल अनुष्काने केला.
भूमी पेडणेकरच्या "हवामान योद्धा" या उपक्रमाचे समर्थन करण्यासाठी अनुष्का पुढे आली आहे. 'वन विश फॉर अर्थ' या मोहिमेद्वारे हवामान खराब करणाऱ्या अनेक घटनांबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण केली जात आहे. अनुष्काशिवाय अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्यासारख्या अनेक कलाकारांनी या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे.