मुंबई- अभिनेत्री आलिया भट्टनं सोशल मीडियावर नुकताच आपला एक फोटो शेअर केला आहे. हा सन किस फोटो काढण्यासाठी अनुष्का शर्मानं आपल्याला प्रेरणा दिल्याचं तिनं सांगितलं आहे. रविवारी सकाळी आलियानं नैसर्गिक लाईटमधील आपला हा फोटो शेअर केला.
फोटोला कॅप्शन देत आलिया म्हणाली, हॅपी सनलाईट संडे. पुढे ती म्हणाली माझ्या घरात येणाऱ्या सूर्यप्रकाशात फोटो काढण्यासाठी मला प्रेरित केल्याबद्दल धन्यवाद अनुष्का. हा प्रकाश तुझ्या आणि माझ्या आयुष्यात नेहमी येत राहो. यावर अनुष्कानंही लगेचच कमेंट केली आहे. अभिनेत्री म्हणाली, अशा प्रेरणेसाठी नेहमी माझ्याकडे ये.