मुंबई- जमशेदपूरच्या टाटानगर रेल्वे स्थानकावरुन २५ जुलैला रात्री ३ वर्षीय बालिकेचे अपहरण करण्यात आले होते. या मुलीचे कापलेले शिर आणि शरीर रेल्वे पोलिसांना सापडले आहे. यामुळे, बलात्कार करुन मुलीचे शिर कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा अनेक स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. अनुष्कानेही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.
जमशेदपूर बलात्कार प्रकरणावर अनुष्काची प्रतिक्रिया, असं केलं ट्विट - बालिकेचे अपहरण
अनुष्काने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, एक तीन वर्षांची चिमुकली जी रेल्वेस्थानकावर आपल्या आईशेजारी झोपली आहे, तिचं अपहरण होतं. तिच्यावर सामुहिक बलात्कार केला जातो आणि तिचं शीर धडापासून वेगळं केलं जातं. हे कृत्य अमानवीय आणि अतिशय घाणेरडं आहे.

अनुष्काने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, एक तीन वर्षांची चिमुकली जी रेल्वेस्थानकावर आपल्या आईशेजारी झोपली आहे, तिचं अपहरण होतं. तिच्यावर सामुहिक बलात्कार केला जातो आणि तिचं शिर धडापासून वेगळं केलं जातं. हे कृत्य अमानवीय आणि अतिशय घाणेरडं आहे.
ही घटना ऐकताच माझा राग अनावर झाला. हे खरंच भीतीदायक आहे. मी अशी आशा आणि विनंती करते, की या घटनेत लवकरात लवकर न्याय मिळो आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. जेणेकरून पुन्हा कधी असं कृत्य करण्याची कोणाचीही हिम्मत होणार नाही, असं अनुष्काने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.