पुणे -निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या घरी तब्बल ११ तास तपासणी केल्यानंतर आयकर विभागाचे कर्मचारी बाहेर पडले आहेत. अनुराग कश्यपचा लॅपटॉप, मोबाईल व बँकेशी संबंधित कागदपत्रे या अधिकाऱ्यांनी बरोबर नेली आहेत. ११ तासाच्या या चौकशीमध्ये अधिकाऱ्यांनी फँटम या फिल्म प्रॉडक्शन संबंधी माहिती घेतली.
दरम्यान पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये अनुराग आणि तापसी हे दोघं सध्या पुण्यात एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी उपस्थित आहेत. पुण्यातल्या वेस्टिन हॉटेल या ठिकाणी या दोघांची सध्या चौकशी झाल्याचे वृत्त आहे. आयटी विभागाचे अधिकारी बुधवारी पुण्यात दाखल झाले होते. त्यांनी रात्री उशिरापर्यंत अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांची चौकशी केली. त्यांच्या जवळच्या कागदपत्रांची तपासणी केली. आजदेखील आयटी विभागाकडून या दोघांची चौकशी केली जात आहे. या वेळी त्यांचा क्रूदेखील त्यांच्या सोबत होता. एकंदरीतच आयटी विभागाकडून ही चौकशी वेस्टन हॉटेलमध्ये झाली असल्याचे बोलले जातेय बाबतचा आढावा घेतलाय पुण्याचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी....
२२ ठिकाणी कारवाई
दरम्यान अभिनेत्री तापसी पन्नूच्या घरी आयकर विभागाची चौकशी अद्यापही सुरू आहे. आयकर विभागाला तापसीच्या घरी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. ज्याच्या आधारे तिच्या कार्यालयाची तपासणी केली जात आहे. मुंबईसह पुणे येथील २२ ठिकाणी ही कारवाई आयकर विभागाकडून केली जात आहे. या छाप्यामध्ये नेमके कोणते पुरावे हाती लागले आहेत याचा तपशील अद्याप पुढे आलेला नाही.
काल मुंबईत पडल्या धाडी
आयकर विभाग अर्थात इन्कम टॅक्सने आता आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवल्याचे दिसत आहे. इन्कम टॅक्सने मुंबईत काल अनेक बॉलिवूडकरांवर धाडी टाकल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक- निर्माता अनुराग कश्यप आणि विकास बहलच्या घरी इनकम टॅक्स विभागाने धाड टाकली. मुंबईत अनेक ठिकाणी हे धाडसत्र सुरू होते. अचानक पडलेल्या या धाडीने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांनी मागील काही दिवसात केंद्र सरकारविरोधात अनेक ट्विट केले होते. त्या बदल्यात हे धाडसत्र असल्याची चर्चा सुरू आहे.
अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू का रडारवर?