महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

योगी उत्तर प्रदेशचे मालक नाहीत मुख्यमंत्री आहेत, अनुराग कश्यपचा टोला - अनुराग कश्यप

योगी उत्तर प्रदेशाचे मालक नाही, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मी मोदींचा समर्थक नाही. मात्र तरीही मी १०० टक्के भारतीय आहे. मी भारतातच चित्रपट बनवतो आणि इथून पुढेही बनवणार, असं अनुरागनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अनुराग कश्यपचा योगींना टोला

By

Published : Jul 27, 2019, 1:26 PM IST

मुंबई- देशभरात मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांविरोधात विविध क्षेत्रातील ४९ मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 23 जुलैला पत्र लिहिले होते. यानंतर या पत्रावर 62 कलाकारांनी पत्राद्वारेच टीका केली आहे. यात मधुर भंडारकर यांचाही समावेश होता. याच प्रकरणी आता मधुर भंडारकर यांच्यावर टीका करत अनुराग कश्यपने योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मालक नसून मुख्यमंत्री असल्याचे म्हटलं आहे.

मधुर भंडारकर यांनी माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत अनुराग कश्यपवर निशाणा साधत म्हटलं होतं, की जे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करतात, तेच उत्तर प्रदेशात जाऊन आपल्या चित्रपटांचं चित्रीकरण करतात आणि उत्तर प्रदेश सरकारकडून आपल्या चित्रपटांसाठी सबसिडी घेतात. योगींचा विरोध करणाऱ्या लोकांनी जोपर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत चित्रपटासाठी सबसिडी घ्यायलाही नकार दिला पाहिजे. मात्र, पैशांचा विषय आला की हे लोक पलटतात.

यावरच प्रतिक्रिया देत अनुरागनं आता एक ट्विट शेअर केलं आहे. काय विनोद आहे. माझा जन्म उत्तर प्रदेशात झाला, तिथेच मी लहानाचा मोठा झालो. चित्रपटाला मिळणारी सबसिडी ही योगींनी सुरू केली नाही. योगी उत्तर प्रदेशाचे मालक नाही, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मी मोदींचा समर्थक नाही. मात्र तरीही मी १०० टक्के भारतीय आहे. मी भारतातच चित्रपट बनवतो आणि इथून पुढेही बनवणार, असं अनुरागनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details