मुंबई - अभिनेत्री तापसी पन्नु सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. अलिकडेच तिने तिच्या बालपणीचा एक फोटो शेअर केला. या फोटोसोबतच एक संदेश देखील तिने दिला आहे. मात्र, तिच्या या फोटोवर दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि विकी कौशल यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
तापसीने लहानपणी धावण्याच्या शर्यतीत पहिला क्रमांक पटकावला होता. हाच फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'खेळ' माझ्या आयुष्यातला महत्वाचा भाग आहे. शाळेत असताना रेसचा ट्रॅक हा माझ्यासाठी युद्धक्षेत्र असायचा', असे कॅप्शन तिने या फोटोवर दिले आहे.
तिच्या या फोटोवर अनुराग कश्यप आणि विकी कौशल यांनी मात्र, मजेशीर प्रतिक्रिया देत तापसीची खिल्ली उडवली आहे. 'चला एखादा पुरस्कार मिळाला', असे ट्विट करत अनुरागने प्रतिक्रिया दिली आहे. तर, विकी कौशलने 'नक्कीच दोन-चार जणांना धक्का देऊन खाली पाडले असणार', अशी कमेंट केली आहे.
अनुराग कश्यपने केलेले ट्विट
यावर तापसीनेही मजेशीर उत्तर दिले आहे.
अक्षय कुमारने सोशल मीडियावर '#WhyTheGap' हा हॅशटॅग वापरून आपल्या बालपणीचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर ट्विकंल खन्नानेही तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. तर, आता तापसीनेही बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.