मुंबई- बर्फी, काईट्स, गँगस्टर आणि मर्डरसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक अनुराग बासु लवकरच आणखी एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाचं शीर्षक अद्याप ठरलेलं नाही. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख घोषित करण्यात आली आहे.
अनुराग बासुंच्या चित्रपटाची नवी रिलीज डेट; अभिषेक, राजकुमारसह हे कलाकार झळकणार - fatima sana shaikh
या चित्रपटात अभिषेक बच्चन, राजकुमार राव, आदित्य रॉय कपूर, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा आणि पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका आहेत. दंगल गर्ल सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख या चित्रपटाच्या निमित्ताने दुसऱ्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.
या चित्रपटात अभिषेक बच्चन, राजकुमार राव, आदित्य रॉय कपूर, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा आणि पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका आहेत. अशी तगडी स्टारकास्ट असणारा हा चित्रपट २०२० मध्ये २१ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. दरम्यान, दंगल गर्ल सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख या चित्रपटाच्या निमित्ताने दुसऱ्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. तर अभिषेक, राजकुमार आणि आदित्य या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत.