महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अनुपम खेरनी घेतली ऋषी कपूरची भेट, लिहिली खास पोस्ट - neetu kapoor

जर प्रेम, काळजी आणि दृढनिश्चय असेल तर लवकरच शारिरीक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होईल, असे अनुपम यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अनुपम खेरनी घेतली ऋषी कपूरची भेट

By

Published : Jul 19, 2019, 11:48 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर गेल्या काही दिवसांपासून न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत. यादरम्यान अनेक बॉलिवूड कलाकारांनी न्यूयॉर्कमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीचे फोटोही नीतू कपूर सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आता अनुपम खेर यांनीही ऋषी कपूर यांची भेट घेतली आहे.

तुमच्या खास मित्रांसोबत वेळ घालवणं हे नेहमीच प्रेरणादायी आणि सुंदर असतं. नीतू कपूर आणि ऋषी कपूर हे सहनशक्ती आणि सफलतेचं एक उत्तम उदाहरण आहेत. जर प्रेम, काळजी आणि दृढनिश्चय असेल तर लवकरच शारिरीक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होईल, असे अनुपम यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मागच्या वर्षी बॉलिवूडमध्ये बऱ्याच कलाकारांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. सोनाली बेंद्रे, इरफान खान, ताहिरा कश्यप यांच्या कॅन्सरचे वृत्त समोर आल्याने कलाविश्वात खळबळ उडाली होती. त्यानंतर ऋषी कपूर यांनाही कॅन्सरचे निदान झाले. सोनाली बेंद्रे देखील न्यूयॉर्कमधुनच कॅन्सरवर उपचार घेऊन भारतात परतली आहे. तर इरफाननेही भारतात परतताच कामाला सुरुवात केली आहे. त्याचा 'अंग्रेजी मीडियम' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details