महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अनुपम खेरनं शेअर केला 'दिल'च्या सेटववरील फोटो, लिहिली खास पोस्ट - aamir khan

इंदर कुमारद्वारा दिग्दर्शित 'दिल' चित्रपटाच्या सेटवर काम करतानाचा एक फोटो सापडला. जवळपास ३० वर्षांपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील हा सीन जुहू बीच येथे शूट करण्यात आला होता, असे अनुपम यांनी म्हटले आहे.

अनुपम खेरनं शेअर केला 'दिल'च्या सेटववरील फोटो

By

Published : Jul 6, 2019, 5:26 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी नुकताच 'दिल' चित्रपटाच्या सेटवरील आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अनुपम यांच्याशिवाय आमिर खानचीही झलक पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत अनुपम यांनी त्याला कॅप्शनही दिले आहे.

इंदर कुमारद्वारा दिग्दर्शित 'दिल' चित्रपटाच्या सेटवर काम करतानाचा एक फोटो सापडला. जवळपास ३० वर्षांपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील हा सीन जुहू बीच येथे शूट करण्यात आला होता. आम्ही अजूनही स्वतःला गांभीर्याने घ्यायला सुरूवात केली नाही. कारण, आयुष्य खूप निरागस आहे. या फोटोत माझ्याकडे पाहून आमिर काय विचार करत असेल? याबद्दल तुमची मतं जाणून घ्यायला आवडेल, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

या फोटोमध्ये आमिरने लाल रंगाचे स्वेटर घातले आहे. तर चित्रपटात आमिरच्या वडिलांची भूमिका साकारणारे अनुपम या फोटोत फॉर्मल लूकमध्ये दिसत आहेत. या चित्रपटात आमिरच्या अपोझिट माधुरी दीक्षित झळकली होती. चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. अशात आता ३० वर्षांनंतर चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर करत अनुपम यांनी पुन्हा एकदा त्या आठवणी जागवल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details