मुंबई- अभिनेते अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या लग्नाला आज ३४ वर्ष पूर्ण झालं. याच निमित्ताने अनुपम यांनी किरण यांच्यासोबतचा आपल्या लग्नातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेलं कॅप्शन दोघांच्या नात्यातील जवळीकता सांगतं.
असं वाटतं सगळं कालच घडलंय, लग्नाच्या वाढदिवशी अनुपम यांची किरणसाठी पोस्ट - वीर जारा
अनुपम यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं, प्रिय किरण, ३४ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आयुष्यातील खूप मोठा काळ आपण एकमेकांसोबत घालवला आहे. ३४ वर्ष झालेत, मात्र असं वाटतं जसं ही कालचीच गोष्ट आहे
अनुपम यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं, प्रिय किरण, ३४ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आयुष्यातील खूप मोठा काळ आपण एकमेकांसोबत घालवला आहे. ३४ वर्ष झालेत, मात्र असं वाटतं जसं ही कालचीच गोष्ट आहे. तुझ्यासोबत घालवलेल्या त्या प्रत्येक क्षणावर मी प्रेम करतो.
अनुपम यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्यांचे भाऊ राजू खेर आणि आई दुलारी यांचीही झलक पाहायला मिळत आहे. अनुपम यांनी १९८५ मध्ये किरण यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. या जोडीनं वीर जारा, टोटल सियाप्पा आणि रंग दे बसंतीसारख्या चित्रपटांत स्क्रीनदेखील शेअर केली आहे.