महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

किरण खेरबद्दल नकारात्मक अफवा पसरवू नका, अनुपम खेर यांचे आवाहन - किरण खेर,अनुपम खेर

अनुपम खेर यांनी आपली पत्नी किरण खेर यांच्या प्रकृतीसंबंधीच्या बातम्यांचे खंडन केले आहे. अशा अफवा पसरवू नका असे आवाहन अनुपम यांनी सोशल मीडियावरुन केले आहे.

Kiran Kher, Anupam Kher
किरण खेर,अनुपम खेर

By

Published : May 8, 2021, 8:33 PM IST

मुंबई - ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांनी काल इंटरनेटवर काल किरण खेर यांच्या मृत्यूबद्दलच्या बातम्यांचे खंडन केले आहे. असा अफवा पसरवू नका अशी विनंती त्यांनी सोशल मीडियावरुन केली आहे.

शुक्रवारी रात्री अनुपमने सोशल मीडियावर किरण खेर यांच्याबद्दल एक निवेदन सादर केले. पत्नीच्या प्रकृतीविषयी फिरणारी अफवा चुकीची असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात सांगितले. किरण खेर यांनी कोविड प्रतिबंधक लशीचा दुसरा डोस घेतल्याचेही अनुपम यांनी आपल्या निवेदनात सांगितले. अशा नकारात्मक बातम्या पसरवू नका अशी विनंती त्यांनी केली आहे.

आपल्या कुटुंबासमवेत कोविड प्रतिबंधक लसचा दुसरा डोस मिळाल्याचेही अनुपमने सांगितले. लसीकरण केंद्रातील फोटो आणि व्हिडिओ अनुपम खेर यांनी शेअर केला आहे. त्यांनी किरण खेर, त्यांच्या आई दुलारी खेर, भाऊ राजू खेर आणि मेव्हणी रीमा यांचाही फोटो शेअर केलाय.

किरण खेर यांना मल्टिपल मायलोमाचे निदान झाले आहे, हे रक्त कर्करोगाचा असामान्य प्रकार आहे ज्यामध्ये अस्थिमज्जामध्ये असामान्य प्लाझ्मा पेशी तयार होतात आणि शरीराच्या अनेक हाडांमध्ये ट्यूमर तयार करतात.

हेही वाचा - कंगनाला कोरोनाची लागण, म्हणाली- मी कोरोनाला नष्ट करेन, आपण याचा सामना करु

ABOUT THE AUTHOR

...view details