महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अनुपम खेरचे टिक टॉक पदार्पण, शेअर केला पहिला व्हिडिओ - tick tock videos

सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या अनुपम खेर यांनी एक पाऊल पुढे टाकत टिक टॉकवर पदार्पण केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पहिला व्हिडिओ शेअर केला आहे.

Anupam Kher
अनुपम खेर

By

Published : Jan 4, 2020, 7:49 PM IST


मुंबई - अनुपम खेर यांनी टिक टॉकवर पदार्पण केले असून एक व्हिडिओ शेअर करीत चाहत्यांना फॉलो करण्याचे आवाहन केले आहे.

बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी अमेरिकेतील सेंट्रल पार्क मॅनहटनमधून व्हिडिओ शेअर केला आहे. यात अनुपम खेर 'गुंडे' चित्रपटातील 'तुने मारी एन्ट्री और..'' गाणे गुणगुणत येताना दिसतो.

अनुपम यांनी शेअर केलेल्या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''स्वतःला नव्याने शोधण्याचा प्रयत्न कायम ठेवत मी अखेर टिक टॉकवर येण्याचा निर्णय घेतला. हा माझा पहिला व्हिडिओ आहे. या प्लॉटफॉर्मवर नेमके काय पोस्ट केले पाहिजे हे मला अद्यापही माहिती नाही. तुमचे सल्ले मला मदत करु शकतात..जय हो.''

अनुपम खेर नेहमी सोशल मीडियावर आपले मत प्रदर्शित करीत असतात. आता या नव्या प्लॅटफॉर्मवर त्याचा नवा अवतार पाहायला मिळणार आहे.

अनुपम सध्या अमरिकेत आहे. 'न्यू एम्सटर्डम' या नव्या टीव्ही सिरीजचे तो प्रमोशन करीत आहे.

अनुपम 'हॉटेल मुंबई' या चित्रपटात शेवटचा दिसला होता. आगामी 'मुंगीलाल रॉक्स' या चित्रपटात झळकणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details