मुंबई - अभिनेता अनुपम खेर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. आपल्या आयुष्यातील खासगी आणि व्यावसायिक गोष्टी ते या माध्यमातून चाहत्यांशी शेअर करीत असतात.
अनुपम यांनी एक फोटो शेअर करीत त्यामगचा किस्साही शेअर केलाय. या फोटोत अनुपम पॉप सम्राट मायकल जॅक्सनसोबत हात मिळत असताना दिसता. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, ''या फोटोची गोष्ट !! १९९६ मध्ये मायकल जॅक्सन मुंबईत आला होता तेव्हा ओबेरॉय हॉटेलच्या गार्डनमध्ये काही लोकांनी भेटण्याची परवानगी मिळाली होती. मीदेखील यात एक लकी व्यक्ती होतो. भारतभाई शाह यांना धन्यवाद. तिथे पाहुण्यासाठी एक गार्डनमध्ये बॅरिकेडसह छोटे स्टेज उभे करण्यात आले होते. मायकल आला आणि आपल्या बॉडीगार्डसह स्टेजवर उभा राहिला. पाहुण्यांमध्ये तिथे शांतता होती. संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या त्या जादुगाराला मी पाहात होतो.