मुंबई- 'मुल्क', 'मनमर्जिया' यासारख्या अनेक सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली तापसी अनेकदा महिला केंद्रित सिनेमांची निवड करताना दिसते. येत्या दिवाळीत प्रदर्शित होणारा तिचा 'सांड की आँख' सिनेमाही दोन महिलांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक आहे.
हेही वाचा - चित्रपट हिट होवो अथवा फ्लॉप, चाहते नेहमीच माझ्यावर प्रेम करतात - भाईजान
यानंतर काही दिवसांपूर्वीच तापसीनं अनुभव सिन्हा यांच्यासोबत काम करणार असल्याची माहिती दिली होती. शनिवारी तिनं या सिनेमाचं नाव थप्पड असं असल्याचं जाहीर केलं. आता तापसीनं या सिनेमाची रिलीज डेटही जाहीर केली आहे. २०२० मध्ये ६ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
अनुभव सिन्हा यांनी तापसीसोबत देवाचे दर्शन घेतानाचा फोटो शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनध्ये ते म्हणाले, अकरा हा अंक शुभ आहे आणि हा माझा अकरावा चित्रपट आहे. यासोबतच तितकाच कठीणही आहे, आम्हाला यश मिळो. आमचा हा चित्रपट आम्ही भारतीय महिलांना समर्पित करत आहोत, ६ मार्चला येतोय, तुमच्या भेटीला, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा - रविना टंडन बनणार आजी, मुलीसाठी ग्रँड पार्टिचं आयोजन