मुंबई - रक्त आणि घाम गाळून देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे भीक असल्याचे भाष्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून अजूनही वाद सुरूच आहे. याप्रकरणी कंगनाच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंगनाच्या विरोधात ही तक्रार काँग्रेसचे सरचिटणीस भरत सिंह यांनी 28 डिसेंबर रोजी मुंबईत केली आहे. आशिष राय आणि अंकित उपाध्याय या वकिलांच्या माध्यमातून विलेपार्ले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काय आहे तक्रार?
कंगनाच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कंगनाचे हे बेजबाबदार विधान टीव्हीच्या माध्यमातून जगभर गाजले. अभिनेत्रीच्या या विधानामुळे भारतीय नागरिक, महान माजी स्वातंत्र्यसैनिक, नायक आणि माजी नेत्यांच्या राष्ट्रीय प्रतिष्ठेला आणि सन्मानाला धक्का पोहोचला आहे. तिचं हे विधान देशाच्या विरोधात आहे तसेच देशात दंगली आणि दहशतवाद भडकवणारं आहे. आता या तक्रारीनंतर पुन्हा एकदा कंगना चर्चेत आली आहे.
कंगना विरोधात संतापाची लाट
नुकतेच एका टीव्ही चर्चेत पोहोचलेल्या कंगना रणौतने 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे भीक मागून मिळालेले स्वातंत्र्य आहे आणि खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले असे सांगून वाद ओढवून घेतला होता. कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण झाली होती.
पद्मश्री परत घेण्याची मागणी