मुंबई -चीनमधून जगभरात वेगात पसरणारा कोरोना विषाणूची भारतातही दहशत पाहायला मिळत आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसचे सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजनाही करण्यात येत आहे. परदेशातून भारतात परतणाऱ्या नागरिकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत आहे. यामध्ये गायक अनुप जलोटा यांचाही समावेश झाला आहे.
जलोटा यांनी स्वत: च याबाबतची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. अलिकडेच ते लंडनवरुन भारतात परतले. मात्र, त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळाजवळील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. मुंबई महापालिकेकडून परदेशातून येणाऱ्या नागरिकांची विशेष काळजी घेतली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांची वेळोवेळी तपासणी केली जात आहे. यासाठी अनुप जलोटा यांनी यासाठी मुंबई महापालिकेचे आभार मानले आहेत.