मुंबई - 'बाहुबली' स्टार प्रभास आणि सैफ अली खान यांचा आगामी चित्रपट 'आदिपुरुष'च्या रिलीजची तारीख निश्चित करण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने टीम 'आदिपुरुष'ने ही तारीख जाहिर केली. हा चित्रपट संक्रांतीच्या निमित्ताने १२ जानेवारी २०२३ रोजी थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे.
'आदिपुरुष' चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत करीत आहेत. ओम राऊत यांचा 'तान्हाजी' हा ब्लॉकबस्टर चित्रपट संक्रांतीच्या निमित्ताने १० जानेवारी २०२० रोजी रिलीज झाला होता. २०२० वर्षाची सुरूवात या चित्रपटाने धमाकेदार झाली होती. त्यावर्षी बॉक्स ऑफिसवर २७६ कोटींची सर्वाधिक कमाई तान्हाजीने केली होती. त्याामुळे ओम राऊतचा आदिपुरुषही संक्रांतीच्या निमित्ताने रिलीज केला जाणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेता प्रभास, सैफ अली खान, क्रिती सेनॉन आणि सनी सिंग स्टारर 'आदिपुरुष' हा चित्रपट नवीन रेकॉर्ड बनवणार आहे. भारतीय भाषा आणि इंग्रजी व्यतिरिक्त हा चित्रपट जगभरात इंडोनेशिया, श्रीलंका, जपान आणि चीनमध्ये विविध भाषांमध्ये प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे. 'आदिपुरुष' हा चित्रपट 20 हजारांहून अधिक स्क्रीनवर दाखवला जाणार आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाचे मेकिंग बजेट 400 कोटींवर पोहोचले आहे.
ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट यावर्षी ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास भगवान 'राम'च्या भूमिकेत, क्रिती सेनॉन 'सीता'च्या भूमिकेत, सनी सिंग 'लक्ष्मण'च्या भूमिकेत आणि सैफ अली खान 'रावण'च्या भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा -आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी'ची घोडदौड सुरूच, वाचा तिसऱ्या दिवशीची कमाई